IPL Winners 2008-2022 : 2008 पासून आतापर्यंतचे आयपीएलचे सर्व विजेते, या संघाने जिंकली सर्वाधिक वेळा आयपीएल ट्रॉफी

IPL Winners : भारतामध्ये आयपीएल 2008 पासून खेळवण्यात येत आहे तेव्हापासून ते आत्तापर्यंत किती जणांनी ही ट्रॉफी जिंकली यामध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारा संघ कोणता आहे ही माहिती खाली दिलेली आहे.

कोणत्या संघा दरम्यान कुठे सामना झाला होता आणि त्या सामन्याचा मानकरी किंवा मॅन ऑफ द मॅच कोण ठरला होता हे सुद्धा माहिती इथे दिलेली आहे, आयपीएल ने क्रिकेट जगतातलं रूप पालटून टाकलं आयपीएल मुळे क्रिकेट खेळण्यांमध्ये तत्परता आली 20 षटकांच्या या सामन्यामध्ये वनडे सारख्या धावा निघू लागल्यात.

असेच तडाखे बंद कामगिरी करणारे फलंदाज गोलंदाज वेगवेगळ्या वर्षी आपापल्या संघाची मानकरी ठरले व आयपीएल सुद्धा मानकरी ठरले ही माहिती इथे पाहणार आहोत.

आतापर्यंतचे विजेते संघ (IPL Winners)

2008

2008 मधे चेन्नई सुपर किंग्ज ला हरवून राजस्थान रॉयल्स ने आयपीएल चे पहीले जेतेपद मिळवले आणि त्या हंगामाचा हीरो ठरला युसूफ पठाण, आयपीएल च्या २००८ च्या विजेत्या संघाचा कर्णधार द शेन वॉर्न हा होता.युसूफ पठाणाने या सामन्यात ३ विकेट आणि ३९ बॉल मध्ये ५६ धावांची खेळी करून तो सामन्याचा मानकरी ठरला होता.

२००९

2009 मध्ये आयपीएल चा दुसरा हंगाम ८ संघा सहित चालू झाला आणि डेक्कन चार्जेर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळूर मध्ये अंतिम सामन्याची लढत झाली आणि अटीतटीच्या या सामन्यात ऍडम गिलख्रिस्ट चा डेक्कन चार्जेर्स विजयी झाला आणि या सामनावीर ठरला भारताचा माजी कसोटी कर्णधार अनिल कुंबळे.

आतापर्यंतचे सर्व विजेते पाहण्यासाठी येथे क्लिक करा
2010

2010 मध्ये आयपीएल च्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात झाली या हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स मध्ये अंतिम सामना झाला, आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स ला पहिल्यांदा आयपील ची ट्रॉफी मिळाली, या सामन्याचा हिरो होता सुरेश रैना.

2011 (IPL T-20 Winner)

2011 मधे IPL चा चवथा हंगाम १० संघासोबत सुरु झाला, सर्वोत्तम कामगिरी करणारे चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू फायनल मध्ये उतरले, या सामन्यात मुरली विजय ची १५९ धावांची भागीदारी चेन्नई ला पावली आणि २०११ मध्ये दुसऱ्यांदा आयपीएल चे विजेतेपद मिळाले.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

2012

2012 मध्ये आयपीएल चे पाचवे सत्र सुरु झाले ९ संघासोबत, आणि या  सत्रात अंतिम सामन्यात पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्स पोहचली आणि विरोधी टीम होती कोलकत्ता नाईट रायडर्स, KKR चे १९० चे आव्हान चेन्नई ला पार करता आले नाही आणि सुरेश रैना ७३ धावांची खेळी सुद्धा चेन्नई ला पावली नाही, तिसऱ्यांदा चषक घेण्याची चेन्नई चे स्वप्न भंगले आणि कोलकत्याला पहिले विजेतेपद मिळाले आणि या सामन्याचा सामनावीर ठरला मनविंदर बिस्ला.

2013

2013 मध्ये आयपीएल चा सहावा हंगाम सुरु झाला ९ संघासोबत आणि अंतिम सामन्यात पुन्हा चेन्नई धडकली आणि आव्हान होते तगड्या मुंबई इंडियन्स चे, मुंबईच्या तगड्या संघासमोर चेन्नई चा निभाव लागला नाही आणि चवथ्यांदा आयपीएल चे तिसरे विजेतेपद मिळवण्याची संधी घालवली, मराठमोळ्या रोहित शर्मा नेतृत्व करत असणाऱ्या मुंबई इंडियन्स ला आयपीएल चे पहिले विजेतेपद मिळाले.

2014

2014 मध्ये ८ संघासोबत आयपीएल चा सातवा हंगाम सुरु झाला, अंतिम सामन्यात २०१२ चा विजेता कोलकत्ता नाईट रायडर्स आणि पहिल्यांदा किंग्स इलेव्हन पंजाब एकमेकासमोर ठाकले, पण विजेतेपदाचा अनुभव असलेल्या कोलकत्यासमोर पंजाब चा निभाव लागला नाही आणि दुसऱ्यांदा कोलकत्ता संघाने आयपीएल ची ट्रॉफी उंचावली, या सामन्याचा मानकरी ठरला युवा क्रिकेटर मनीष पांडे.

२०१५ ते २०२२ चे विजेते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment