Pan Aadhar Link : 31 मार्च पर्यंत डेडलाईन, या नागरिकांना पॅन-आधाराला लिंक करायची आवश्यकता नाही

Pan Aadhar Link : आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करण्याची 31 मार्चपर्यंत डेडलाईन सरकारने दिली असून त्या अगोदर ज्यांचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नाहीत त्यांना ते लिंक करून घ्यायचे आहेत.

पण याच्यातून काही नागरिकांना सूट दिलेली, कोणकोणत्या नागरिकांना याची गरज नाही ती खाली दिलेली आहे,  जर 31 मार्च पर्यंत ज्यांना सूट नाही त्यांनी आधारला पॅन कार्ड लिंक केले नाही तर त्यांचे पॅन कार्ड कोणत्याही कामाचे राहणार नाही, त्याचा कोणते कामासाठी उपयोग करू शकणार नाहीत.

या पॅन कार्डला अगोदरच आधार लिंक (Aadhar Pan Link Online)

ज्याचे जुने पॅन कार्ड आहे त्या सर्वाना आधार लिंक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे., नवीन पॅन कार्ड काढणाऱ्यांना पॅन कार्ड काढते वेळेसच त्यांचा आधार कार्ड त्याच्यासोबत लिंक केलं जातं त्यामुळे एवढे चिंता करण्याची गरज नाही. पण ज्यांनी केले नाहीत त्यांनी 31 मार्च 2023 पूर्वी आपले पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे.

जेवढे करदाते आहेत त्या सर्व करदात्यांना हे अत्यंत महत्त्वाची सूचना आयकर विभागाकडून देण्यात आलेली आहे,  आयकर अधिनियम 1961 नुसार सर्व पॅन कार्ड धारकासाठी बंधनकारक आहे.

आधारला पॅन लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा

परंतु काही लोकांना 31 मार्च 2023 च्या आधी पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यापासून सूट देण्यात आले आहे.

मे 2017 च्या केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून निघालेल्या अधिसूचनेनुसार काही कॅटेगरीतील लोकांना पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यात सूट देण्यात आली या लोकांसाठी त्यांना आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक नसणार आहे.

यांना गरजेचे नाही

त्यामध्ये आसाम, मेघालय आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमधील लोक, आयकर अधिनियम १९६१ अंतर्गत  गेल्या वर्षी 80 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले व्यक्ती आणि जे भारतीय लोक नाहीत त्यांच्यासाठी हे बंधनकारक नसणार आहे.

या पद्धतीने करा लिंक (Pan Aadhar Link)

आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करायचा असेल तर खालील तीन पद्धतीनुसार तुम्ही लिंक करू शकता एकदम साध्या आणि सोप्या पद्धती असल्यामुळे तुम्ही लगेच आपल्या मोबाईल वरून हे लिंक करू शकणार आहात.

ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी येथे क्लिक करा

पहिली प्रक्रिया : ऑनलाइन प्रक्रिया तुम्हाला आयकर फायलिंग च्या संकेतस्थळावर जाऊन आधार पॅन लिंक ऑप्शन वरून लिंक करू शकता.

दुसरी प्रक्रिया : तुम्ही एसएमएस (SMS) द्वारे सुद्धा पॅन आधार लिंक करू शकता यासाठी तुम्हाला एसएमएस द्वारे 567678 किंवा 561561 वर UIDPAN _ बारा डिजिट आधार नंबर _ दहा डिजिट PAN नंबर लिहून पाठवावा लागेल.

तिसरी प्रक्रिया : ऑफलाइन प्रोसेसने सुद्धा तुम्ही पॅन कार्डला आधार लिंक करू शकता यासाठी तुम्हाला जवळच्या पॅन सेवा केंद्रात किंवा आधार सेवा केंद्रात जाऊन ते करावे लागेल.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment