RTE Free Admission : आरटीई साठी शाळा नोंदणी सुरु, विद्यार्थी नोंदणी या दिवशी होणार सुरु

RTE Free Admission 2023-24 : आरटीई नुसार खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 25% जागा राखीव ठेवण्यात येतात.

दरवर्षीप्रमाणे 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी खाजगी शाळांमध्ये 25% राखीव जागावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.

या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात शाळांची नोंदणी करण्यात येत असून ही प्रक्रिया येत्या 23 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

शाळा नोंदणीसाठी कोणतेही मुदतवाढ दिली जाणार नाही असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट सांगितले आहे.

👇👇👇
नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन प्रक्रिया (RTE Free Admission)

शाळांनी केलेल्या नोंदणीचे पडताळणी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी करायची आहे या प्रक्रियेत प्रवेश अर्ज भरताना चुकीची माहिती भरून प्रवेश घेतल्याच्या आढळल्यास तो प्रवेश रद्द करण्यात येणार आहे.

पालकांसाठी सूचना

तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा, अनेक अर्ज भरू नयेत अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनात आल्यास

अर्ज सोडती साठी विचारात घेतला जाणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी आरटीई अंतर्गत 25% राखीव जागा शिक्षणासाठी एकाच टप्प्यात सोडत काढण्यात येणार असून,

तसेच शाळेत आरटीई अंतर्गत उपलब्ध जागा एवढी एक प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे.

सोडचित नाही नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी पुरेसा कालावधी देण्यात येणार असल्याचे गोसावी यांनी परिपत्रकातून सांगितले.

👇👇👇
वयोमर्यादा, पात्रता व अटी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या शाळावर कारवाई होणार (RTE Update)

आरटीई नुसार 25% राखीव जागा साठी पात्र असूनही नोंदणी न केलेल्या किंवा प्रवेश स्तरावर एकूण क्षमतेच्या 25% जागा उपलब्ध करून न देणाऱ्या

शाळावर शिक्षणाधिकाऱ्याने तत्काळ नियमाप्रमाणे कारवाई करावी असा आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिला आहे.

शिक्षणा हक्क कायद्यानुसार खाजगी शाळा मधील 25% राखीव जागा वरील प्रवेश प्रक्रिया लागू असणाऱ्या सर्व शाळांचे नोंदणीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.

या शाळांनी 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत ही नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी काढले आहे.

प्रवेश कधी चालू होणार (RTE Admission 2023-24)

शाळांची नोंदणी संपल्यानंतर ७ दिवसामध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याची माहिती दिली आहे.

प्रवेश प्रक्रिया अंदाजे १०-१५ फेब्रुवारी दरम्यान प्रवेश प्रक्रिया चालू होण्याची शक्यता आहे.

👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment