Kukkut Palan Information – बापरे 100 रुपयांचं एक अंड !! ही कोंबडी चांगलीच डिमांडमध्ये, कडकनाथलाही टाकलं मागे

‘असिल’ कोंबडीची मान लांब असून, भरपूर पंख, डोळे दाट ही तीची वैशिष्टे आहेत. त्यांचे पाय मजबुत आणि सरळ असतात. तसेच या कोंबड्या ईतर कोंबड्यांपेक्षा वजनालाही जास्त, म्हणजे ४-५ किलोच्या असतात.

तर ईतर कोंबड्याचे वजन ३-४ किलो असते. लहान कोंबडीचे सरासरी वजन ३.५-४.५ किलो आणि तर अगदी छोट्या कोंबडीचे वजनही सरासरी वजन २.५-३.५ किलो असते. प्रोटीन आणि फायबरचे प्रमाणही यामध्ये जास्त असल्याने या कोंबडीला आणि तिच्या अंड्यांना जास्त डिमांड आहे.

या कोंबडीचे मांस आणि अंडी यातून मिळणारा फायदा लक्षात घेता त्यांना पाळणाऱ्यांची संख्या देखिल झपाट्याने वाढली आहे. खरेतर या कोंबड्यांपासून मिळणारे सरासरी अंडी उत्पादन खरेतर ईतर कोंबड्यांच्या मानाने कमी असते. कारण, त्या वर्षाला केवळ ६० ते ७० अंडी घालत असल्या तरी अंड्यांची किंमत बरीच जास्त आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा