Pune Ring Road : पुणे रिंग रोड ! पहा पूर्ण नकाशा आणि कोण-कोणत्या गावातून जाणार आणि कोणाला पैसे मिळणार

Pune Ring Road : पुणे रिंगरोड तयार करण्याची संकल्पना 2007 मध्ये शहर आणि त्याच्या उपनगरीय भागाला करण्यात आली परंतु , निधीच्या मंजुरी अभावी हा प्रकल्प रखडला होता. सप्टेंबर 2021 मध्ये महाराष्ट्र शासनाने बांधकाम आणि भूसंपादनाच्या खर्चासह 173 Km लांबीच्या (Ring Road Project) रिंगरोड प्रकल्पासाठी 26.83 हजार कोटी रुपयांना मान्यता दिली होती.

रिंगरोडमुळे प्रवासाचा वेळ आणि अंतर लक्षणीयरीत्या कमी होईल. यामध्ये सुमारे १५५४.६४ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) चाकण ते नगर रोड या ३२ किमी लांबीच्या पुणे रिंगरोड विभागाच्या विकासकामांची सुरवात सध्या प्रगतीपथावर आहे.

पुणे रिंग रोड – (Pune Ring Road Construction cost) बांधकामाचा तपशील आणि त्यासाठी होणारा खर्च

रिंगरोड हा आठ पदरी द्रुतगती महामार्ग म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यामुळे जास्तीत जास्त 120 प्रति तास वाहनाचा वेग असेल.

पुण्यातील रिंगरोडसाठी महाराष्ट्र सरकारने २६,८३१ कोटी रुपयांना मंजुरी दिली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD-Public Works Department) रिंगरोडच्या बहुप्रतिक्षित बांधकामासाठीचे चारही पॅकेजेसच्या मंजुरीसाठी ठराव जारी केला आहे.

सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP- Public Private Partnership) मधून रिंग रोड प्रकल्प जाणार आहे.

ring road pune map

प्रदूषण कमी होण्यास मदत

प्रस्तावित रिंगरोडमुळे सुमारे २०% ते 25% प्रदूषण कमी होण्यास मदत होईल आणि या भागातील विकासाला चालना मिळेल.

या प्रकल्पामुळे पुण्यातील रस्ते जोडणीत सुधारणा होईल, नाशिक, अहमदनगर, कोकण,सासवड, आणि मुंबई यांसारख्या भागात जाणारी वाहने शहरातून जातात

त्यामुळे वाहतूक कोंडी आणि वायू व ध्वनी प्रदूषण होते.

👇👇👇
कसा होणार रिंग रोड पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अश्या प्रकारे बांधला जाणार रिंग रोड

  • पहिल्या पॅकेजमध्ये – पुणे-सोलापूर रोडवरील सेलू ते सोरतापवाडी या २९.८ किमी लांबीच्या बांधकामाचा समावेश असेल. या पॅकेजसाठी 3.52 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.
  • दुसऱ्या पॅकेजमध्ये – सोरतापवाडी ते वाळवे या ३६.७३ किमी लांबीच्या रस्त्याच्या बांधकामाचा समावेश असेल.दुसऱ्या पॅकेजची किंमत सुमारे 4.50 हजार कोटी रुपये असेल.
  • तिसऱ्या पॅकेजमध्ये – आळंदी – मरकळ मार्गावरील उर्से ते सेलू या ३८.३४ किलोमीटरच्या बांधकामाचा समावेश असेल.
  • चौथ्या पॅकेजमध्ये – 68.8 किलोमीटर रस्त्याच्या बांधकामाचा समावेश असेल पुणे रिंगरोडमुळे बाहेर जाणाऱ्या वाहनांची रहदारी कमी होईल आणि शहरात ये-जा करणे सुलभ होईल.

जिल्ह्यातील ह्या गावांतून जाणार रिंगरोड 

  • खेड, मावळ, हवेली, पुरंदर आणि भोर या पाच तालुक्‍यांतून जाणार  सुमारे १०३ किलोमीटर लांबीचा आणि ११० मीटर रुंदीचा हा रस्ता जाणार आहे.
  • जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात या मार्गाच्या मोजणीचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. त्यापाठोपाठ आता पूर्व भागातही रिंगरोडच्या मोजणीस शासनाने मान्यता दिली आहे.
  • पुणे – सातारा रोडवरील वरवे बुद्रूक येथून हा मार्ग सुरू होणार असून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से येथे येऊन तो मिळणार आहे.

pune ring road map

असा असेल पूर्व भागातील मार्ग

  • पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग , नाशिक, सोलापूर आणि सातारा महामार्गाला जोडणारा रिंगरोड मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्यांतील ४६ गावांतून जाणार
  • सहा पदरी महामार्गावर एकूण ७ बोगदे, ७ अंडरपास, दोन नद्या आणि दोन रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी पूल
👇👇👇
कसा होणार रिंग रोड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

2 thoughts on “Pune Ring Road : पुणे रिंग रोड ! पहा पूर्ण नकाशा आणि कोण-कोणत्या गावातून जाणार आणि कोणाला पैसे मिळणार”

Leave a Comment