IPL Winners : 2008 पासून आतापर्यंतचे आयपीएलचे सर्व विजेते, या संघाने जिंकली सर्वाधिक वेळा आयपीएल ट्रॉफी

2008 ते २०14 चे विजेते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

2015

2015 मध्ये आयपीएल चा आठवा हंगाम सुरु झाला, या हंगामात भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्स आणि मराठमोळ्या रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स एकमेकासमोर उभे ठाकले पण मराठी माणूस कुठे कमी नसतो हे दाखवत मुंबईने २०१३ नंतर दुसऱ्यांदा आयपीएल च्या चषकावर आपले नाव कोरले, या सामन्याचा मानकरी ठरला मराठमोळा कर्णधार रोहित शर्मा.

२०१६

2016 मध्ये पुन्हा सुरु झाला आयपीएल चा नववा तडाखा आणि या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात अंतिम सामन्याची लढत झाली आणि हा सामना सनरायजर्स हैद्राबाद ने जिंकून आपली पहिली ट्रॉफी घेतली, या सामन्याचा मानकरी ठरला बेन कट्टिन्ग.

2017

2017 मधील आयपीएल ८ संघादरम्यान खेळवण्यात आली आणि अंतिम सामन्यात धडकले दोन्ही मराठमोळे संघ मुंबई इंडियन्स आणि रायसिंग पुणे सुपरजायंट हा अंतिम सामना हैद्राबाद येथे खेळविण्यात आला होता, कृणाल पंड्या च्या धडाकेबाज खेळी मुळे मुंबई इंडियन्स ने पुण्याला हरवत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवणारा पहिला संघ ठरला.

२०१८

2018 मध्ये सुद्धा आयपीएल ८ संघासोबत खेळवण्यात आली आणि अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद दरम्यान झाला, यावेळेस चेन्नई ने सुद्धा तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवून तिसऱ्यांदा चषक मिळवणारा मुंबई इंडियन्स नंतर दुसरा संघ ठरला.

2019

2019 मध्ये आयपीएल चा बारावा हंगाम ८ संघासोबत सुरु झाला, आणि चवथ्यांदा चेन्नई सुपर किंग्स समोर आव्हान होते मराठमोळ्या मुंबई इंडिअन्सचे, हा सामना हैदराबाद येथे खेळवण्यात आला बुमराह च्या दणकट माऱ्यापुढे चेन्नई ची दाळ शिजली नाही, आणि चवथ्यांदा मुंबई ने विजेतेपद मिळवले.

2020

2020 मधे आयपीएल चे तेरावे सत्र कोरोनाच्या संसर्गामुळे दुबई ला चालू झाले आणि अंतिम सामन्यात राजधानी दिल्ली चा दिल्ली कॅपिटल्स आणि मराठमोळा मुंबई इंडियन्स यांच्यात लढत झाली, मुंबई समोर दिल्ली दरबार झुकला आणि पाचव्यांदा मुंबई इंडियन्स विजेतेपदाचा चषक घेतला, सर्वाधिक आयपीएल जिंकणारी मुंबई हि एकमेव टीम आहे यांनी पाचवेळा आयपीएल चे विजेतेपद मिळविले.

2021

2021 मध्ये कोरोनाच्या संसर्गात आयपीएल खेळवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट संघटनेने घेतला पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका पाहता हि आयपीएल तात्पुरती थांबण्यात आली, या आयपीएल मध्ये सुद्धा कोरोनाच्या शिरकाव झाला होता , सलग पाच ते सहा महिन्यानंतर पुन्हा हि आयपीएल खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सप्टेंबर- ऑक्टोबर मध्ये उर्वरित सामने खेळवण्यात आले.

१५ ऑक्टोबर रोजी खेळल्या गेलेला आयपीएल अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स दरम्यान झाला. या अटीतटीच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्व करत असलेल्या चेन्नईने कोलकत्याला २७ धावांनी पराभूत केले आणि चवथ्यांदा आयपीएल ची ट्रॉफी घेतली.

२०२२

२०२२ च्या आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स मध्ये अंतिम सामना पार पडला, या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने विजेतेपद मिळवले.

२०२३
या वर्षी चा हंगाम ३१ मार्च पासून चालू होणार असून अंतिम सामन्याचे वेळापत्रक सुद्धा आलेले नाही त्यामुळे याची अपडेट सर्व सामने झाल्यानंतर मिळेल.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा