Old Pension Scheme : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा, लवकरच ओल्ड पेन्शन धारकांना मिळेल खात्यात पैसे !

Old Pension Scheme : गेल्या अनेक दिवसांपासून पेन्शन संदर्भातील बातम्या आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांच्या चॅनेलवर, वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर पाहायला मिळाल्या. एकंदरीत पेन्शन संदर्भात सगळीकडे मोर्चा, आंदोलन, उपोषण देखील झाले. नुकतीच एक बातमी Old Pension Scheme संदर्भात आलेली आहे.ही बातमी दिलासा देणारी आहे.

Old Pension Scheme लवकरच नव्याने सुरू…

डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शन संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजना जर पुन्हा सुरू केली तर राज्याच्या तिजोरीवर जास्तीचा बोजा पडेल असे विधान केले होते, यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जुन्या पेन्शन संदर्भात सगळ्या गोष्टींना नकार दिला होता माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस यांची औरंगाबाद येथे नुकतीच सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी जुन्या पेन्शन संदर्भात व योजना संदर्भात एक महत्त्वाचे विधान केले. त्याचबरोबर ही जुनी पेन्शन योजना लवकरच नव्याने सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रयत्न देखील तातडीने करून असे देखील त्यांनी औरंगाबाद येथील सभेमध्ये लोकांना सांगितले.

या विधानाला दुजोरा देत ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील या योजनेमध्ये ज्या काही त्रुटी आहेत तसेच ही जुनी योजना नव्याने कश्या पद्धतीने सुरु करता येईल यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तरतुदी तपासून पुन्हा नव्याने या योजनेचा लाभ पेन्शन धारकांना घेता येईल यासाठी प्रयत्न करू असे देखील सांगितले. या सूचक विधानामुळे जुन्या पेन्शन योजना धारकांना आनंदाची बातमी मिळालेली आहे.

जर ही योजना पुन्हा नव्याने सुरू झाली तर लाखो पेन्शन धारकांना दिलासा मिळेल यात शंका नाही.नुकत्याच एका माध्यमाला माहिती देत असताना असे देखील कळाले की, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या जुन्या पेन्शन योजनेचा आढावा घेतलेला आहे तसेच ही योजना नव्याने सुरू करण्यासाठी वित्त विभागाला आदेश ही देण्यात आलेले आहेत. वित्त विभाग आढावा घेऊन या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयात सादर करतील. ही योजना लवकरच सुरू होईल यामुळे पेन्शन धारकांच्या गोत्यामध्ये आनंदाचे वातावरण देखील दिसून येत आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment