Gharelu Kamgar Yojana : घरकाम करणाऱ्या कामगारांना मिळणार सरकारतर्फे १० हजार रुपये, नवीन शासन निर्णय आला

नोंदणी

लाभार्थी घरेलू कामगार नाव नोंदणी.

पात्रता : ज्याने वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली असतील परंतू साठ वर्ष पूर्ण केलेली नसतील आणि जो कोणतेही घरेलू काम करीत असेल तो प्रत्येक घरेलू कामगार, या अधिनियमान्वये लाभार्थी म्हणून नावनोंदणी करण्याकरीता पात्र असेल.नाव नोंदणी अर्ज नमुना च मध्ये, विहित करण्यात येईल (नियम ९(१) अन्वये) आणि तो मंडळाने प्राधिकृत केलेल्या अधिका-याकडे सादर करण्यात येईल.लाभार्थीं म्हणून नोंदणीसाठी करावयाच्या अर्जासोबत खालील कागदपत्रे असावीत.
रु.३०/ इतके शुल्क चलन / मागणी अधिकर्ष / पोस्टल ऑर्डर / रोखीने भरण्यात यावे.घरेलू कामगाराचा वयाचा दाखला.सध्याच्या मालकाचे प्रमाणपत्र किंवा तो घरेलू कामगार आहे हे नमूद करणारे लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.रहिवाशी दाखला.घरेलू कामगाराच्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या तीन प्रती.लाभार्थी म्हणून घरेलू कामगाराची नोंदणी झाल्यानंतर,सचिव त्याची नोंद नोंदवहीत घेईल.हि नोंदवही नमुना छ नुसार असेल.ओळखपत्र :लाभार्थी म्हणून घरेलू कामगाराची नोंदणी झाल्यानंतर मंडळ प्रत्येक लाभार्थींला ओळखपत्र देईल.असे ओळखपत्र नमुना ज नुसार असेल.घरेलू कामगारांचे अंशदान : ज्या घरेलू कामगाराची लाभार्थी म्हणून नोंदणी झाली असेल त्याला,नोंद झालेल्या मंडळाकडे रु.५/- इतके अंशदान दरमहा द्यावे लागेल.

👇👇👇
शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇
नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇
 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा