Birth Certificate : जन्म नोंदणीचा दाखला असा काढा ऑनलाईन ते हि तुमच्या मोबाईलवरून, हि पहा प्रोसेस

अशी करा नोंदणी

जर तुम्हाला जन्म नोंदणीचा दाखला काढायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही संकेतस्थळावर जाऊ शकता तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करायचे आहे.

जर या अगोदर तुम्ही या पोर्टलवर नोंदणी केले असेल तर तुम्हाला लॉगिन करून ग्रामविकास व पंचायत राज विभागामध्ये जायचंय तिथे गेल्यानंतर उपविभागामध्ये जन्म नोंदणी दाखला येथे क्लिक करायचा आहे.

जन्म नोंदणी दाखला काढण्यासाठी येथे क्लिक करा

इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही त्यांच्या दुसऱ्या संकेतस्थळावर जाल तिथे गेल्यानंतर तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमची ग्रामपंचायत, अर्जदाराचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक असल्यास आधार क्रमांक टाकून सबमिट करून इतर आवश्यक माहिती तुम्हाला तिथे भरायचे आहे.

त्यानंतर पाच दिवसांमध्ये सर्व पडताळणी करून तुम्हाला जन्म नोंदणीचा दाखला दिला जातो आवश्यकता भासल्यास दवाखान्यातील नोंदीचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यावे लागेल, यासोबतच पालकाचे आवश्यक कागदपत्रे सुद्धा मागितले जाते ते सुद्धा तिथे सबमिट करावे लागतील.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा