Post matric scholarship : “या” विध्यार्थ्यांना ५० हजार शिष्यवृत्ती जाहीर, लगेच ऑनलाईन अर्ज करा

कोलगेट कीप इंडिया स्मायलींग फाउंडेशन (Keep India Smiling Foundation) मार्फत दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांसाठी 20 ते 50 हजाराची शिष्यवृत्ती दरवर्षी दिली जाते.

यावर्षी सुद्धा कोलगेट मार्फत शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत कोलगेट मार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती मध्ये खालील तीन शिष्यवृत्ती चा समावेश आहे याची सविस्तर माहिती आपण यात पाहुयात.

कोलगेट मार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्या

 • (दहावी नंतर अकरावीसाठी) – Class 11 – 2022-23
 • (१२ वी नंतर कोणत्याही पदवीसाठी उदा. BA,B.Com, BBA, B.Sc इत्यादी ) – 3 Year Graduation – 2022-23
 • (१२ वी नंतर BAMS, BHMS, MBBS इत्यादी साठी) – Professional Categories – 2022-23

दहावी पास नंतर इयत्ता अकरावी साठी

पात्रता :

 • अर्जदार हा 2022 मध्ये दहावी पास असावा आणि अकरावी मध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला असावा.
 • दहावी मध्ये कमीत कमी 75 टक्के मार्क असावेत आणि कुटुंबाचे उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असावे.

मिळणारे लाभ (Colgate Scholarship)

 • 20 हजार दरवर्षी दोन वर्षासाठी

(colgate scholarship apply online) ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2022 (अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा)

पदवीधरांसाठी स्कॉलरशिप

पात्रता : 

 • अर्जदार हा मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी पास असावा, कमीत कमी 60% गुण मिळालेले असावे.
 • मान्यताप्राप्त विद्यापीठात तीन वर्षाच्या पदवीधर उपक्रमासाठी (उदा. BA,B.Com, BBA, B.Sc इत्यादी) प्रवेश घेतलेला असावा.
 • कुटुंबाचे उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असावे.

मिळणारे लाभ (Colgate Scholarship)

 • 30 हजार रुपये दरवर्षी सलग तीन वर्ष

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2022 (अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा) (colgate scholarship apply online)

प्रोफेशनल कोर्स साठी शिष्यवृत्ती

पात्रता : 

 • अर्जदार हा मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी पास असावा, कमीत कमी 60% गुण मिळालेले असावे.
 • मान्यताप्राप्त विद्यापीठात BE, B.Tech, BDS, MBBS या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा.
 • कुटुंबाचे उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असावे.

मिळणारे लाभ

 • 50 हजार दरवर्षी सलग चार वर्ष

आवश्यक कागदपत्रे

 1. पासपोर्ट साईज फोटोग्राफ
 2. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड, पॅन कार्ड.
 3. उत्पन्नाचा दाखला
 4. बारावीची मार्कशीट
 5. शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्याची फी रिसीट
 6. उमेदवार अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2022 (अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा)