Nabard Warehouse Scheme : गाव तिथे गोदाम योजनेच्या मदतीने गावकरी होतील खुश, शासनाचा आला नवीन जीआर!

Nabard Warehouse Scheme : भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही भारतामध्ये अनेक ग्रामीण भागामध्ये शेती हा व्यवसाय केला जातो. शेतीच्या माध्यमातून आजही अनेकांचे पोट दोन वेळ चालते आणि आज देखील विविध तंत्रज्ञान आणि विकासाच्या मार्गाने शेती व्यवसाय शेतकरी मोठ्या आनंदाने करत आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तसेच शेती व्यवसाय समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “गाव तिथे गोदाम योजना” गावकऱ्यांसाठी आणलेली आहे.

या योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांना विविध सुविधांची साठवण करणे, कृषी प्रक्रिया सुधारणे, बाजारपेठेमध्ये अन्नधान्य मालाला योग्य भाव उपलब्ध करून देणे, वित्त पुरवठा, विपणन कर्ज यासारख्या सुविधा मिळवून देणे.

शेतमालाचा होणारा अपव्यय टाळणे तसेच शेतकऱ्यांना व्यक्तिगत व अन्य काही प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देणे यासारख्या सुख सुविधा या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घेता येतील.

एवढे मिळते अनुदान (Nabard Gav Tithe Godam)

“गाव तेथे गोदाम” ही योजना राष्ट्रीय पातळीवर राबवण्यासाठी नॅशनल बँक फोर एग्रीकल्चर आणि रुलर डेव्हलपमेंट यांच्या ग्रामीण भंडार योजनेमध्ये सांगण्यात आलेले काही निकष उद्देश आणि नियमावली यांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, गाव तिथे गोदाम म्हणजेच नाबार्ड या योजनेअंतर्गत अनुदान देखील देण्यात आलेले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

ईशान्य कडील राज्य, डोंगराळ प्रदेश भागातील राज्य सहकारी बँक,बचत गट संस्था, अनुसूचित जाती जमाती प्रस्तावधारक यांच्या सहकारी संस्थांच्या प्रकल्पांना एकंदरीत खर्चाच्या 33.33% खर्च अनुदान मंजूर..

शेतकरी आणि त्यांचे गट, सवर्ग कृषी संघटना यासारख्या संस्थांच्या प्रकल्पांना एकंदरीत खर्चाचा 25 टक्के अनुदान दिले जाईल.

व्यक्तिगत पातळीवर वैयक्तिक ऑफरधारक तसेच कंपनी, कार्पोरेट कंपन्या कॉर्पोरेशन इत्यादींना एकंदरीत खर्चाचा 15 टक्के अनुदान दिले जाईल.

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ यांच्या अनुदानाने गोदाम बांधणाऱ्या सहकारी संस्थांना गोदामाच्या दुरुस्तीसाठी एकंदरीत प्रकल्पासाठी 25% अनुदान व भांडवल पुरवले जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

या योजनेचे शेतकऱ्यांना असलेले फायदे (Nabard Warehouse Scheme)

  • शेतकऱ्यांचा माल शास्त्र पद्धतीने साठवून या मालाची काळजी घेतली जाते.
  • योग्य काळजी घेतल्याने वस्तूचा भाव वाढतो, वस्तूला योग्य दर मिळतो.
  • गोदामातील कीटक उंदीर यांच्यापासून मालाला संरक्षण प्राप्त होते शेतमालाचा अपव्य टाळता येतो
  • धान्य कर्ज तारण योजनेच्या अंतर्गत शेतमालावर कर्ज मिळवता येते.
  • साठवणूक योजना व्यवसायिक पद्धतीने करत असल्याने एक नवीन व्यवसाय म्हणून देखील शेतकऱ्यांना करता येऊ शकतो.
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment