RTE Admission 2023-24 : 1 ली ते 10 वी मोफत शिक्षणासाठी नवीन नोंदणी सुरू,असा भरा अर्ज

आर.टी.ई. २५% आरक्षण प्रवेश प्रक्रिया (ऑनलाईन अर्ज)

भाग २ : बालक

पुढे दिलेल्या सूचनावाचून काळजीपूर्वकअर्ज भरावा.
१) प्रथम अर्ज नोंदणी करावी मग आपल्याला अर्ज क्रमांक व पासवर्ड मोबाईलवर प्राप्त होईल.
२) बालकाची व पालकाची सर्व माहिती अचूक आणि खरी भरावी
३) आपल्या परिसरातील १ किंवा ३ किलोमीटर शाळा दिसत असल्यास क्लिक करावी.
४) बालकाच्या प्रवेशवर्गाचे नाव लिहावे.
५) शाळा क्लिक झाल्यास आवश्यक ती सर्व कागद पत्रे अपलोड करावीत.
६) सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याची खात्री झाल्यावर मगच अर्ज कन्फर्म करावा
७) अर्ज कन्फर्म झाल्यावर त्याची प्रिंट काढून,आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह आपल्याजवळील मदत केंद्रावर जाऊन आपला अर्ज बरोबर भरला याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.मदत केंद्रावरील अधिकारी आपला अर्ज बरोबर असल्याची खात्री करून देतील .व आपला अर्ज लॉटरी प्रक्रियेसाठी योग्य असल्याचे सांगतील

भाग ३ : सोडत

१) शाळेच्या प्रवेशस्थर वर्गाची प्रवेश क्षमता जास्त असेल आणि शाळेकडे कमी प्रवेशपात्र अर्ज आले असतील तर शाळा सर्व अर्जांना प्रवेश देईल.
२) शाळेकडे (शाळेची) प्रवेश क्षमता कमी असेल तर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या द्वारा लॉटरी पद्धतीने ड्रॉ काढून प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.
३) निवड झालेली यादी येथे प्रकाशित केली जाईल.
४) पालकांनी अर्ज क्रमांक भरून लॉगीन केल्यावर त्यांना यादी दिसेल व अॅडमिट कार्डची प्रिंट काढता येईल.
५) पालकांकडून आवश्यक व योग्य अशा सर्व गोष्टींची पूर्तता करून मगच शाळा प्रवेशपात्र बालकाला प्रवेश देईल.

 आवश्यक कागदपत्रांची यादी येथून डाउनलोड करा 

वयोमर्यादे साठी जीआर येथून डाउनलोड करा 

rte admission 2023

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा