महिलांसाठी सुवर्णसंधी, घरबसल्या करा हे 10 व्यवसाय अन् कमवा दहा लाखापेक्षा जास्त किंमत | Housewife Business Ideas

मेणबत्ती बनवणे : जर तुम्हाला एखादे क्रिएटिव्हिटी असलेले काम करायचे असेल तर तुम्ही मेणबत्ती देखील बनवू शकता. मेणबत्तीचे प्रशिक्षण घेऊन तुम्ही या मेणबत्ती ऑनलाईन तसेच वेगवेगळ्या केक शॉप मध्ये विकू शकता. या माध्यमातून देखील तुम्हाला घरबसल्या कोणत्याही प्रकारचे जास्त भांडवल न वापरता पैसे कमवता येऊ शकतात.

चॉकलेट बनवणे : चॉकलेट हा पदार्थ लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक सगळी खात असतात, अशावेळी तुम्ही घरच्या घरी वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चॉकलेट बनवणे शिकू शकतात आणि हे बनवलेले चॉकलेट तुम्ही वेगवेगळ्या केक शॉप व कंपनीला देखील विकू शकता.

बेकरी वस्तू बनवणे : जर तुम्हाला वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आवड असेल त्यात केक, बिस्कीट, नानकटाई यासारखे बेकरीजन्य पदार्थ तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात आणि त्यांचे ऑर्डर घेऊन बाजारामध्ये तसेच ऑनलाइन शॉपिंग मध्ये देखील विकू शकता या प्रकारच्या वस्तूंमध्ये कमी खर्चात कमी जास्त उत्पादन देखील घेऊ शकता

युट्युब द्वारे पैसे कमवणे : जर तुम्हाला बोलायची आवड असेल, काही विचार मांडायची आवड असेल तर अशावेळी तुम्ही Youtube माध्यमाद्वारे छोटे छोटे व्हिडिओ बनवून तुम्ही लोकांना माहिती देऊ शकता. जर तुमचे फॉलोवर जास्त असतील तर अशावेळी तुम्हाला युट्युब घरबसल्या पैसे देतो.

पापड/लोणचे यासारखे पदार्थ बनवणे : जर तुम्हाला घरगुती पदार्थ बनवण्याची आवड असेल तर अशावेळी तुम्ही घरच्या घरी पापड लोणचे व मसाले यासारखे पदार्थ बनवून तुम्ही बाजारामध्ये तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून हे पदार्थ लोकांना विकू शकतात. या पदार्थाच्या माध्यमातून देखील तुम्ही घरबसल्या खूप सारे पैसे कमवू शकतात.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा