Antyodaya Anna Yojana : आजपासून या नागरिकांना मिळणार १ ही रुपया न देता मोफत धान्य

Antyodaya Anna Yojana : महाराष्ट्र शासन नेहमीच गोर-गरिबांसाठी अनेक नवनवीन योजना राबवत असते, त्यातीलच एक महत्त्वाची व सर्वांसाठी गरजेचे असणारी योजना म्हणजेच अंत्योदय अन्न योजना याची सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत..

महाराष्ट्र राज्यातील सर्व राशन कार्ड धारकांना राशन पूर्णपणे फ्री (एकही रुपया न देता)मिळणार आहे. तसा शासनाचा निर्णय  देखील निर्गमित झालेला आहे.या योजनेअंतर्गत 15 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

👇👇👇
👉👉शासननिर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ मिळत आहे,त्यातच आता केंद्रातील प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेचाही मोफत लाभ मिळणार आहे.

कोरोना संकटामुळे या योजनेचा अनेकांना आधार मिळाला होता दरम्यान आता कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असून शासनाने निर्बंध ही हटविले आहेत, मात्र केंद्रीय मंत्री मंडळाने पुन्हा या योजनेला मुदतवाढ दिल्यामुळे प्राधान्य तसेच अंत्योदयाच्या लाभार्थ्यांना लाभ मिळणारच आहे.

योजनेचा मुख्य उद्देश Free Ration in Maharashtra 

योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच देशातील सर्व नागरिकांना अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हाच आहे, आपल्या देशात असे कित्येक लोक आहेत ज्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे.

ते स्वतः आपल्या कुटुंबाची उपजीविका देखील करू शकत नाहीत,उदरनिर्वाहासाठी देखील सक्षम नाहीत,अशा लोकांसाठी शासनाने ही योजना चालू केलेली आहे.

या योजनेचा संपूर्ण लाभ देशातील सर्व गोरगरीब/दिव्यांगांनाही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

अर्ज कसा व कुठे करायचा ?Antyodaya Anna Yojana AAY Online Apply

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

👇👇👇
👉👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकेसाठी आवश्यक कागदपत्रे Antyodaya Anna Yojana

 • आधार कार्ड
 • बीपीएल प्रमाणपत्र
 • उत्पन्नाचा दाखला
 • अर्जदाराकडे पूर्वी कोणतेही रेशन कार्ड नाही,असे प्रतिज्ञापत्र.
 • कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र
 • मतदार ओळखपत्र
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचा फोटो

योजनेसाठी ही आहे पात्रता (पात्र उमेदवारांनाच मिळेल लाभ)

 • दारिद्र्यरेषेखालील उमेदवार किंवा कुटुंब या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
 • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,50,000/- रु.  पेक्षा जास्त नसावे.
 • अपंग व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात
 • कुटुंबाचे नेतृत्व करणाऱ्या विधवा आणि ६० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक अर्ज करू शकतात.
 • या योजनेसाठी ग्रामीण व डोंगरी भागातील आदिवासी अर्ज करू शकतात.
 • जमीन नसलेले शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी
 • ग्रामीण कारागीर किंवा कारागीर ग्रामीण आणि शहरी भागातील.
 • अशक्त आजारी व्यक्ती / अपंग व्यक्ती / 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती किंवा विधवा यांच्या नेतृत्वाखालील कुटुंबे ज्यांना
 • उदरनिर्वाहाचे कोणतेही निश्चित साधन किंवा सामाजिक आधार नाही.
 • गंभीर आजारी किंवा विधवा किंवा अपंग व्यक्ती .
👇👇👇
👉👉आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

Leave a Comment