MCGM Recruitment 2023: मुंबई महानगरपालिकेत 10 वी पासवर बंपर भरती सुरु

MCGM Recruitment 2023 : मुंबई महानगरपालिकेत फक्त 10 वी पास वर विविध पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

ही पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्यात येत असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरातीत वाचून दिलेल्या विहित नमुन्यात ऑफलाईन पद्ध्तीने अर्ज सादर करायचे आहेत.

bmc मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
पदांचा तपशील
 • कनिष्ठ लघुलेखक निवृत्तनिवेदक (मराठी) – 18
 • कनिष्ठ लघुलेखक निवृत्तनिवेद (इंग्रजी) – 09

पदसंख्या MCGM Recruitment

 • एकूण – 27 रिक्त जागा
 • उमेदवारांनी आरक्षणनिहाय पदसंख्या पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहावी.
पगार
 • 25,500/- ते 81,100 पर्यंत

शैक्षणिक पात्रता Mumbai Mahanagarpalika

 • उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च व तांत्रिक शिक्षण मंडळाचा MSCIT परीक्षा प्रमाणपत्र धारक असावा.
 • इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट
 • मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट ही गती असणे आवश्यक आहे.
bmc अर्जचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

वयोमर्यादा

 •  18 जानेवारी 2023 रोजी,
 • खुल्ला प्रवर्ग – 18 ते 38 वर्ष
 • मागास प्रवर्ग – 18 ते 43 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता MCGM Bharti

 • महानगरपालिका सचिव यांचे कार्यालय, खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महानगरपालिका मार्ग, मुंबई – 400 001.
 • अर्ज या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रांच्या छायांकित साक्षांकित प्रतीसह टपालाद्वारे अथवा व्यक्तिशः कार्यालयात आणून द्यावेत.

अर्ज करण्याची तारीख

 • दिनांक 18 जानेवारी 2023 ते 9 फेब्रुवारी 2023 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत
bmc मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

 • जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्याची प्रत काढून भरलेले अर्ज महानगरपालिकेच्या मुख्यालयातील महानगरपालिका सचिव कार्यालयात विहित कालावधी सादर करावे.
 • अर्ज विहित नमुन्यात स्व हस्ताक्षरात व मराठी भाषेत आणि सर्व दृष्टीने संपूर्ण भरलेला असावा.
 • उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात सर्व कागदपत्रासह सादर करणे आवश्यक आहे.
 • उमेदवाराने ई-मेल आयडी आणि पत्रव्यवहाराचा पत्ता सुस्पष्ट पूर्ण व व्यवस्थित लिहिलेला असावा.
 • विहित नमुन्यात नसलेले व मराठी भाषेत नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांची संख्या,आरक्षण यामध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे.
 • रिक्त पदांच्या संख्येत बदल करण्याचे तसेच प्रवर्गनिहाय पदसंख्या,भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर पूर्वसूचना न देता स्थगित करणे,अंशतः पूर्णतः रद्द करण्याचे अधिकार महानगरपालिका सचिव यांना राहतील.
bmc आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment