MPSC : गट ब आणि गट क साठी एमपीएससी मध्ये 8169 पदांसाठी ऐतिहासिक भरती

MPSC : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट ब व गट क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

ही भरती एकूण 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

👇👇👇
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

पदसंख्या MPSC

  • एकूण – 8169 रिक्त जागा

पदांचा तपशील

  • सहायक कक्ष अधिकारी – 78 जागा
  • राज्यकर निरीक्षक – 159 जागा
  • पोलीस उपनिरीक्षक – 374 जागा
  • दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक – 49 जागा
  • दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क (गृह) – 6 जागा
  • तांत्रिक सहायक, गट-क (वित्त) – 1 जागा
  • कर सहाय्यक, गट-क (वित्त) – 468 जागा
  • लिपिक-टंकलेखक – 7034 जागा
👇👇👇
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता

  • उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता आवश्यक.
  • विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
  • पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील,परंतु मुख्य परीक्षेकरिता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांक पर्यंत पदविका/पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

अर्ज शुल्क

  • अमागास – 394/-
  • मागासवर्गीय- 294/-

अर्ज पद्धती MPSC

  • ऑनलाईन
👇👇👇
अधिकृत वेबसाईट संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
 Online अर्ज सुरु होण्याची तारीख
  • २५ जानेवारी २०२३

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • १४ फेब्रुवारी २०२३

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवार हा भारतीय नागरिक असावा, उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत इतर पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येतील.
  • अर्ज सादर करतानाच जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
  • जिल्हा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
  • एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही
  • आयोगाच्या कार्यालयात, परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच शारीरिक चाचणी व मुलाखतीच्या वेळी मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे.
👇👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment