RTE Admission : नियमात झाला बदल,फक्त “या” च मुलांना मिळणार इंग्लिश शाळेत मोफत शिक्षण

RTE  Admission : (Right to Education) म्हणजे शिक्षणाचा हक्क अंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे 25 टक्के जागा या आर्थिक वंचित गटासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात.

RTE मार्फत तुमच्या मुलांना इंग्लिश मीडियम आणि मराठी मिडीयम मध्ये मोफत शिक्षणाची सुविधा दिली जाते.

या पंचवीस टक्के जागे मार्फत आर्थिक वंचित गटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा पुरवली जाते, यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो.

सन 2023-24 साठी फेब्रुवारी 2023 पासून होणार आहे अधिकृत दिनांक जाहीर झाल्यानंतर खालील लिंकवरून तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

अर्ज सादर करण्याअगोदर तुमचा मुलगा/मुलगी पात्र आहे का नाही हे पाहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि वयोमर्यादेची माहिती अवश्य वाचा.

2023 साठी अर्ज कोण करू शकतो ? (RTE Maharashtra )

  • वय वर्ष 4.5 पासून वय वर्ष 7.5 पर्यंत आर्थिक वंचित गटातील मुले-मुली येथे अर्ज करू शकतात.

rte maharashtra admission

 आवश्यक कागदपत्रांची यादी येथून डाउनलोड करा  

 

अर्ज करण्याची पद्धत RTE Maharashtra Admission

  • https://student.maharashtra.gov.in या पोर्टल वर जावे.
  • सर्वप्रथम विद्यार्थ्यांची नोंदणी करून घ्यावी.
  • त्यानंतर जुना पासवर्ड बदलून घ्यावा.
  • नवीन पासवर्ड ने लॉगिन करावे.
  • विद्यार्थ्यांची मूळ माहिती भरावी.
  • नंतर अर्ज भरावा.
  • अर्ज भरल्यानंतर जवळच्या शाळेची निवड करावी.
  • अर्ज सबमिट करावा.

प्रवेशासाठी महत्त्वाची कागदपत्रे 

  • पत्त्याचा पुरावा जसे की रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, गॅसचे बुक, भाडेपट्टी, कर पावती, विजेचे बिल, पाण्याचे बिल इत्यादी.
  • आरक्षित संवर्गातून अर्ज करत असल्यास जातीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. (उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही)
  • आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पालकाचे उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक. (पालकाचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे)
  • विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला
  • विद्यार्थी अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला.

rte maharashtra admission

संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा (नवीन GR नुसार )

(दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी)

  • Playgroup & Nursery : ४ वर्षे ५ महिने ३० दिवस
  • Junior KG : 5 वर्षे ५ महिने ३० दिवस
  • Senior KG : 6 वर्षे ५ महिने ३० दिवस
  • 1st Standard : 7 वर्षे ५ महिने ३० दिवस

rte maharashtra admission

वयोमर्यादेसाठी जीआर येथून डाउनलोड करा 

महत्त्वाच्या सूचना RTE  Admission 

  • https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या पोर्टलवरून आपल्या जवळच्या उपलब्ध शाळेची(rte school list) माहिती घ्यावी त्यानंतरचा अर्ज करावा.
  • https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या पोर्टल व्यतिरिक्त ईतर कोणतेही पोर्टल आरटीई चे अधिकृत पोर्टल नाही.
  • इतर पोर्टलवरून अर्ज केल्यास स्विकारले जाणार नाहीत.
  • फेब्रुवारी 2023 दुपारी 03 वाजेपासून संपूर्ण राज्यात अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येतील.

rte maharashtra admission

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “RTE Admission : नियमात झाला बदल,फक्त “या” च मुलांना मिळणार इंग्लिश शाळेत मोफत शिक्षण”

Leave a Comment