Zero Balance Account : सर्वसामान्यांना, कर्मचाऱ्यांना किंवा शेतात काम करणाऱ्या व्यक्तींना बँकेत जाऊन खाते खोलायला खूप अवघड जाते, पण आपल्याकडे एकतरी बँकेचा खातं असणं आवश्यक आहे, जे आपली सेविंग असते ते सेविंग ठेवण्यासाठी, आपल्या आर्थिक व्यवहार सुरळीत चालण्यासाठी किंवा सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी हे बँकेचे खाते अत्यंत उपयुक्त ठरते.
कधी कधी या खात्यामध्ये आपण (MAB) मिनिमम एव्हरेज बॅलन्स मेंटेन नाही केला तर हे खाते आपल्याला चालवण्यास खूप जड जाते त्यांची रक्कम दर महिन्याला ती बँक कापून घेत असते, आणि परत आपण एखाद्या दुसऱ्या बँकेचे खाते ओपन करायला जातो आणि तिथे सुद्धा त्या अटी नियम सारखेच असतात.
आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की अशा कोणत्या बँका आहेत झिरो बॅलन्स मध्ये तुमचं अकाउंट ओपन करतात ते पण तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून करू शकता त्यासाठी बँकेत जाण्याची गरज पडत नाही.
आत्ताच अकाउंट काढण्यासाठी येथे क्लिक करा
मोबाईलवरच कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत किंवा व्हिडिओ केवायसीने तुम्ही हे कागदपत्र दाखवू शकता व्हेरिफाय सुद्धा करू शकता.
खालील नमूद केलेल्या बँका तुमच्या जवळपास असतील तर त्या बँकेचे खाते तुम्ही आत्ताच मोबाईल वरून ओपन करू शकता यासाठी कोणतेही चार्जेस तुम्हाला कोणालाही द्यायची गरज पडत नाही आणि त्या खात्यामध्ये तुम्ही जास्त पैशाची देवाण-घेवाण नाही केली तरी ते खाते तुम्हाला कोणते चार्जेस लावत नाहीत.
कोणत्या बँकेमध्ये काढाल खाते (Zero Balance Account)
- एचडीएफसी बँक
- ॲक्सिस बँक
- बँक ऑफ बडोदा
- कोटक महिंद्रा
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- आयडीएफसी फर्स्ट बँक
- आयसीआयसीआय बँक
- इंडसइंड बँक
- आयडीबीआय बँक
- युनियन बँक इत्यादी.
आवश्यक कागदपत्रे
- तुम्हाला बँक खाते काढण्यासाठी आधार कार्ड व आधार कार्ड ला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे.
- पॅन कार्ड
- पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा इलेक्ट्रिसिटी बिल सुद्धा वापरू शकता.
- फोटो
- एक कोरा पेपर
- एक काळा पेन
आत्ताच अकाउंट काढण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज कसा कराल (Zero Balance Account)
त्या त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटला संकेतस्थळाला भेट देऊन तिथून तुम्ही झिरो बॅलन्स अकाउंट विकल्प निवडून ऑनलाईन अर्ज करू शकता.
कागदपत्राची पडताळणी कशी केली जाते
कागदपत्राची पडताळणी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने किंवा तुमच्या जवळच्या शाखेत जाऊन सुद्धा करू शकता ऑनलाईन पद्धतीमध्ये व्हिडिओ केवायसी चा ऑप्शन विकल्प बँकेने ठेवलेला आहे.
अर्ज कसा करावा
- विविध बँका नुसार त्यांची प्रक्रिया वेगवेगळी आहे आपण एचडीएफसी बँकेची प्रक्रिया या लेखात जाणून घेणार आहोत.
- सगळ्यात अगोदर आपल्याला एचडीएफसी बँक डॉट कॉम या संकेतस्थळावर जायचे आहे तिथे गेल्यानंतर ओपन इन्स्टंट अकाउंट हा विकल्प दिसेल तिथे क्लिक करायच आहे.
- त्यानंतर आपला आधार क्रमांक मोबाईल नंबर टाकायचा, आधार लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकायचा पॅन कार्ड ची माहिती भरायची.
- फोटो अपलोड करायचा, जो पत्ता तुम्हाला हवाय तो पत्ता सध्याचा पत्ता म्हणून वापरायचा, कागदपत्रांमध्ये फक्त फोटो तुम्हाला अपलोड करायचा असतो बाकी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता इथे भासत नाही.
- सर्व प्रोसेस करून अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज सबमिट झाल्यानंतर लगेच तुम्हाला अकाउंट नंबर मिळतो.
- त्यानंतर तुम्हाला तीन दिवसाच्या आत संबंधित शाखेत जाऊन किंवा ऑनलाईन केवायसी करून घेणे बंधनकारक असते.
झिरो बॅलन्स खाते (Zero Balance Account)
झिरो बॅलन्स खाते काढण्यासाठी तुम्हाला अर्ज भरते वेळेस सॅलरी अकाउंट हा विकल्प निवडायचा आहे जर तुम्हाला दर महिन्याला काही रक्कम येत असेल तर, नाहीतर तुम्ही संबंधित बँकेत लेखी अर्ज देऊन तुमचं खातं झिरो बॅलन्स करू शकता.
काय सुविधा मिळतात
यामध्ये SMS Banking, ATM cum Debit Card, पासबुक तुमच्या पत्त्यावर काही दिवसात पाठवले जाते.
नोट : विविध बँका नुसार प्रक्रिया वेगवेगळे आहे सोबतच विविध बँकांच्या सुविधा सुद्धा वेगवेगळ्या आहेत, आपण अर्ज करते वेळेस आपल्या जवळच्या शाखेची निवड करावी आणि त्या बँकेच्या नियमानुसार तुम्हाला खाते वापरावे लागेल.