Aadhar Update Online : आत्ताच आधार अपडेट करा, १८० दिवसात तहसीलदार येईल चेक करायला

Aadhar Update Online : आधार कार्ड अद्ययावत न केल्यास सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, असा इशारा आधार प्राधिकरणाने (UIDAI) दिला आहे.

योजनाचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डमध्ये पीओआय आणि पीओएसंबंधी तपशील नेहमी अद्ययावत असायला हवा, असे प्राधिकरणाने म्हटले आहे.

आता तुमचे आधार कार्ड तहसीलदारांकडून चेक केले जाणार आहे, त्यामुळे आधार कार्ड नसेल ते तुम्हाला लवकर काढावे लागणार आहे

आधार कोणत्या पद्धतीने अपडेट कराल ?

  • आधार कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी अद्ययावत करता येते.
  • ऑनलाइनसाठी/ऑफलाइनसाठी ५० रु. शुल्क लागते.
👇👇👇
नाव,पत्ता,फोटो अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा

काय आहे पीओआय (POI) व पीओए (POA)?

  • पीओआय (POI) म्हणजेच प्रूफ ऑफ आयडेंटिटी, यात आपल्या ओळखीचा पुरावा सादर करावा लागतो.
  • पीओए म्हणजे प्रूफ ऑफ ॲड्रेस (POA) यात पत्त्याशी संबंधित पुरावे द्यावे लागतात,

(UIDAI Update) ओळखीसाठी कोणते पुरावे लागतील?

आधार प्राधिकरणाने १ जुलै २०२२ रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार, पीओआय म्हणजेच ओळखीच्या पुराव्यासाठी फोटो असलेली कागदपत्रे आवश्यक आहेत.

यात पॅन कार्ड, ई-पॅन, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, शस्त्र परवाना, फोटो बैंक एटीएम कार्ड, फोटो क्रेडिट कार्ड, विवाह प्रमाणपत्र, किसान फोटो पासबुक, इत्यादी कागदपत्रे चालू शकतात.

पत्त्यासाठी कोणते पुरावे लागतील?

पीओए म्हणजेच पत्त्याच्या पुराव्यासाठी नाव व पत्ता असलेला दस्तऐवज आवश्यक आहे. यात पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पेन्शनर कार्ड

किंवा  किसान पासबुक, अपंगत्व कार्ड, मनरेगा कार्ड, शाळेचे वैध ओळखपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, वीज बिल, पाणी बिल, लँडलाईन फोन बिल, पोस्टपेड मोबाइल बिल यांचा समावेश आहे.

👇👇👇
आधार अपडेट प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

(UIDAI Aadhar Update Online) कितीवेळा काय अपडेट करता येईल ?

  • आधार कार्डमध्ये नाव दोन वेळा बदलता येते.
  • जन्मतारीख केवळ एकदाच बदलू शकता.
  • लिंग बदलही केवळ एकदाच शक्य आहे.
  • पत्ता कितीही वेळा बदलू शकता.

ही मर्यादा ओलांडल्यानंतरही बदल करायचा असल्यास यूआयडीएआयच्या विभागीय कार्यालयात पुराव्यांसह भेट द्यावी लागेल.

१८० दिवसात होईल तपासणी

तुम्ही जर 18 वर्षापेक्षा अधिक व्हायचे असाल आणि आतापर्यंत तुम्ही आधार कार्ड काढले नसेल तर आणि नवीन आधार कार्ड काढत असाल तर १८० दिवसाच्या आत तहसीलदार किंवा त्यांचे सहकारी येऊन आधार चेक करतील आणि तथ्य आढळले तरच आधार कार्ड दिले जाईल अन्यथा दिले जाणार नाही.

👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment