FIR Online : हरवलेल्या मोबाईल, कागदपत्रांचा रिपोर्ट कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये असा करा तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन

FIR Online : आपले अत्यावश्यक कागदपत्रे हरवल्यानंतर जर तुम्हाला ते मिळवायचे असतील तर विविध ठिकाणी तुम्हाला पोलिसांचा रिपोर्ट मागितला जातो, आणि ते रिपोर्ट काढण्यासाठी तुमची बरीच तारांबळ होते पण हा रिपोर्ट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सहज पद्धतीने काढू शकता.

यासाठी तुम्हाला कुठे फिरायची गरज नाही आणि हा रिपोर्ट सबमिट करून तुम्ही तुमचा हरवलेला मोबाईल किंवा कोणते कागदपत्र सहज मिळवू शकता यासाठी तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही आपला रिपोर्ट सबमिट करू शकता.

FIR ऑनलाइन भरण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल असेल किंवा इतर कोणत्या दस्तावेज असतील त्याची माहिती तिथे भरायचे आहे तुम्ही कोणते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असो, मोबाईल असो, तुमचं एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असो किंवा इतर कोणते कागदपत्र हरवले तर त्याची माहिती भरून तुम्ही ते कागदपत्र डुप्लिकेट मागवण्यासाठी सहज अर्ज करू शकणार आहात.

असा सबमिट करा रिपोर्ट (FIR Online)

रिपोर्ट सबमिट करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्हाला अहवाल प्रकार म्हणजे काय हरवलं ते तिथे सिलेक्ट करायचं, त्यानंतर पोलीस ठाणे कोणत ते सिलेक्ट करायचा आहे, दस्ताऐवज मध्ये तुमचा मोबाईल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस किंवा इतर कोणते कागदपत्र हरवले त्याची माहिती सिलेक्ट करायची आहे.

त्यानंतर त्याचा क्रमांक टाकायचा आहे मोबाईल जर हरवला असेल तर आयएमए (IMEI) नंबर टाकून तुम्ही पुढे प्रोसेस करू शकता.

कधी हरवल्याची तुम्हाला तारीख टाकायची आहे, त्यानंतर हरवल्याचं स्थान तुम्हाला तिथे टाकायचा आहे, तुमचं पूर्ण नाव टाकून ई-मेल आयडी सुद्धा अपडेट करायचा आहे.

त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा पत्ता तिथे मेन्शन करायचा आहे आणि पिनकोड टाकायचा आहे एवढे सगळे भरल्यानंतर , तुम्हाला तपशील मध्ये नेमकं कशा पद्धतीने ती वस्तू हरवलेली आहे त्याची सविस्तर माहिती तुम्हाला भरून द्यायची आहे आणि खाली Declaration दिलेला आहे ते कॅपच्या भरायचा.

FIR ऑनलाइन  प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जमा करा किंवा सबमिटला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा तो रिपोर्ट सबमिट होतो आणि एक पीडीएफ तिथे लगेच तुम्हाला जनरेट होते ते पीडीएफची प्रिंट काढून तुम्ही कोणती वस्तू परत मिळवण्यासाठी त्याचा वापर करू शकता.

जर तुमचा मोबाईल हरवला असेल तर मोबाईल ब्लॉक करण्याची सिस्टीम सुद्धा तिथे दिलेली आहे, सर्वप्रथम त्याचा ऑप्शन येतो मोबाईल ब्लॉकिंग चा तिथे जाऊन आहे, IMEI नंबर टाकून तुम्ही मोबाईल नंबर सुद्धा ब्लॉक करू शकता.

 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment