Gramsevak Bharti : ग्रामसेवकच्या १० हजार पदांसाठी बम्पर भरती सुरु, पगार २० हजार पासून पुढे, वेळापत्रक डाउनलोड करा

Gramsevak Bharti : गावातील कारभार पाहणाऱ्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्य नंतर व गावातील जनतेच्या कामासाठी नेमलेला सरकारी व्यक्ती म्हणजे ग्रामसेवक.

कोरोना महामारी नंतर ग्रामसेवक भरती झालेलीच नाही. जिल्हा परिषदेने ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल 10,000 हजार पदांसाठी भरती होणार असल्याची माहिती दिली आहे आणि त्याचा अधिकृत शासन निर्णय सुद्धा जाहीर केली आहे.

तसेच ही भरती कधी होईल याचे वेळापत्रक सुद्धा जाहीर केले आहे, या भरतीमध्ये महसूल विभाग, ग्राम विकास विभाग, कृषी विभाग आणि आरोग्य विभागाची काही पदे वगळली तर सर्व पदांची भरती केली जाणार आहे.

भरतीसाठी पुढील काही दिवसात अधिकृत जाहिरात येणार आहे, त्याअगोदर संपूर्ण माहिती तुमच्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.

वेळापत्रक डाउनलोड करा

शैक्षणिक पात्रता

 • कमीत कमी 12 वी पास असणे आवश्यक आहे.
 • 12 वी मध्ये तुम्हाला कमीत कमी 60% गुण असणे आवश्यक आहे आणि जर बारावी मध्ये 60% गुण नसतील,
 • तर कृषी क्षेत्रातील विषयामध्ये पदविका किंवा पदवी धारण केलीली असावी,
 • पदवी कोणत्याही क्षेत्रातील असेल तर अर्ज करू शकता जसे की बीए, बीकॉम, बीएससी किंवा इतर कोणतीहि 3 वर्षाची किंवा 4 वर्षाची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
 • वरील पात्रतेत तुम्ही बसत असाल तर तुम्ही ग्रामसेवक भरतीसाठी पात्र आहात,  पदवी धारण केलेल्या उमेदवारास कोणत्याही टक्केवारीची अट नाही.

वयोमर्यादा

 • ग्रामसेवक भरतीसाठी शासनाने ठरवून दिल्यानुसार वयोमर्यादा आहे त्यासाठी तुमचं वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्ष असावे.
 • जर इतर संवर्गातून अर्ज करत असाल तर वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि जर तुम्ही आरक्षित संवर्गातून अर्ज करत असाल तर शासनाच्या नियमाप्रमाणे 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन (Gramsevak Bharti 2023)

 • 5,200/- ते 20,200/- पर्यंत आणि इतर अनुज्ञेय भत्ते सुद्धा दिले जातात.
ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय डाउनलोड करा
परीक्षेची तयारी

ग्रामसेवक भरतीसाठी मागील माहितीनुसार 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते.

 • मराठी या विषयाचे (15 प्रश्न)-30 गुण
 • इंग्रजी विषयाचे (15 प्रश्न)-30 गुण
 • अंकगणित व बुद्धिमत्ता (15 प्रश्न)-30 गुण
 • सामान्य ज्ञान (15 प्रश्न)-30 गुण
 • कृषी आणि तांत्रिक (40 प्रश्न) – 80 गुण

याप्रमाणे 100 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील असे एकूण 200 गुणांची परीक्षा असेल.

हे 200 गुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दीडतास कालावधी दिला जातो या दीडतासामध्ये तुम्हाला 200 गुणांचे शंभर प्रश्न सोडवायचे आहेत.

या परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे कुठलाही प्रश्न जर चुकला तर त्याचे गुण कापले जाणार नाहीत म्हणजे तुम्ही सगळे प्रश्न सोडवू शकता.

प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात त्यापैकी योग्य तो एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो.

कधी येईल जाहिरात (Gramsevak Bharti)

 • शासनाने पारित केलेल्या केलेल्या निर्णयानुसार या भरती जाहिरात जानेवारी च्या शेवटपर्यंत येणे अपेक्षित आहे.
  ग्रामसेवकाची कामे (Gramsevak Bharti 2023)
 • ग्रामसेवकाला गावातील भरपूर कामे असतात यामध्ये जन्म मृत्यू नोंद, विवाह नोंदणी करणे व वेळच्यावेळी दाखले देणे.
 • रहिवाश्याची इतर कामे, शासनाच्या योजनांची योग्य अमंलबजावणी, शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर करणे हे असतात.
 • ग्रामसेवक त्या गावातील ग्रामपंचायतीचा शासकीय अधिकारी असतो गावातील कामे त्याच्या सहीशिवाय होत नाहीत.
मित्रांनो, आत्ताच WhatsApp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment