Kadba Kutti Machine Yojana : 75% अनुदानावर कडबा कुट्टी यंत्राचे वाटप सुरु, इथे करा अर्ज

Kadba Kutti Machine Yojana  : शेतकरी बांधव गुरांना चारा देण्यासाठी कोयत्याने किंवा एखाद्या कापण्याच्या वस्तूने कडबा किंवा इतर चारा कापतो.

यामुळे शेतकऱ्यांना दुखापत होण्याची शक्यता जास्त असते या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत यांत्रिकरणाच्या सुविधा पोहोचवाव्यात,

यासाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल द्वारे यंत्र पुरवण्याच्या वेगवेगळ्या योजना दिल्या जातात यातीलच एक योजना म्हणजे कडबा कुट्टी मशीन योजना.

👇👇👇
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेमध्ये शेतकऱ्याला 75 टक्के अनुदानावर कडबा कुट्टी यंत्राचे वाटप केले जाते 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरायची असते.

तर 75 टक्के रक्कम शासन भरते यासाठी पात्रता नियमाने अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. पीडीएफ मध्ये दिलेली संबधित योजनांचा लाभ शेतकऱ्याने अवश्य घ्यावा.

सोबतच इतर सुद्धा शासनाचे योजना विषयी परिपत्रक दिलेल आहे यामध्ये तुम्हाला आवश्यक असलेल्या यंत्रावर किती अनुदान मिळते ते पाहू शकता.

पात्रता (Kadba Kutti Machine Yojana)

 • शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
 • शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
 • शेतकरी अनु. जाती, अनु. जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
 • फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील.
 • एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल

उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही.

👇👇👇
संपूर्ण माहितीचे पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे (MahaDBT)

 • आधार कार्ड
 • ७/१२ उतारा
 • ८ अ दाखला
 • खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
 • जातीचा दाखला (अनु. जाती व अनु. जमाती साठी)
 • स्वयं घोषणापत्र
 • पूर्वसंमती पत्र
👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment