Mahajyoti Free Tablet Yojana : 10 वी पास विद्यार्थ्यांना सरकारतर्फे मोफत टॅबलेट चे वाटप सुरु,आत्ताच ऑनलाईन अर्ज करा

Mahajyoti Free Tablet Yojana : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या राज्य शासनाचे संस्थे कडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट वाटप करण्यात येणार आहे.

यासाठी पात्र उमेदवाराकडून 31.03.2023 पूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत या योजनेसाठी अर्ज करण्या अगोदर विद्यार्थ्याने सविस्तर माहिती वाचून आपला अर्ज व्यवस्थित भरावा ही विनंती.

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या/विमुक्त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना MHTCET/JEE/NEET 2025 करिता पूर्व प्रशिक्षण साठी या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाज्योती मार्फत या परीक्षेकरिता पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 जीबी डेटा दररोज देण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक पात्रता (Mahajyoti Free Tablet Yojana)

  • विद्यार्थी उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा/असावी.
  • अर्जदार मागासवर्गीय विमक्त जाती/भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी कोणत्याही प्रवर्गातील असावा/असावी.
  • अर्जदार हा नॉन क्रिमिलियर म्हणजे उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेला असावा.
  • जे विद्यार्थी सन 2023 ची दहावी परीक्षा देत आहे ते विद्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र असून त्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दहावीचे हॉल तिकीट व नववीची गुणपत्रिका जोडायचे आहे, इतर वर्षी उत्तीर्ण झालेलं विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नसतील.
  • विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा त्याबाबतची कागदपत्र त्यांनी भविष्यात सूचनेनुसार संबंधित संस्थेला देणे गरजेचे असेल.

आवश्यक कागदपत्राचा तपशील

  • दहावीचे ओळखपत्र/प्रवेश पत्र/हॉल तिकीट.
  • जातीचा दाखला
  • नववीचे गुणपत्रक
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र.
अर्ज करण्याची प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अटी व शर्ती (Mahajyoti Free Tablet Yojana)

  • अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 3.2023 असून या अगोदर सदर विद्यार्थ्याने आपले अर्ज सादर करायचे आहेत.
  • पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही फक्त ऑनलाईनच अर्ज तुम्हाला सादर करायचे आहेत.
  • हे जाहिरात रद्द करण्याचा, जाहिरात मध्ये मुदतवाढ देण्याचा, अर्ज नाकारण्याचा/स्वीकारण्याचा सर्वाधिकार व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांनी राखून ठेवले आहेत.
  • दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्याला दहावीचे गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजे (बोनाफाईड सर्टिफिकेट) MHT-CET,JEE,NEET या परीक्षेची तयारी करत आहोत असे हमी पत्र मागवण्यात येणार आहेत त्यामुळे त्यानंतर तुम्हाला हे कागदपत्र सादर करावे लागतील.
  • अर्ज भरते वेळेस कोणतीही अडचण आल्यास 0712-2870120/21 या नंबर वर कॉल करू शकता किंवा mahajyotijeeneet24@gmail.com या मेल आयडीवर मेल करू शकता.
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment