Lek Ladki Yojana Maharashtra : शासनाचा निर्णय !! मुलगी असेल तर मिळतील 98000 रुपये,अर्ज करण्याची पद्धत

Lek Ladki Yojana Maharashtra : महाराष्ट्र शासनाने दोन दिवसापूर्वी अर्थसंकल्प जाहीर केला या अर्थसंकल्पात शेतकरी व सर्वसामान्यांसाठी भरपूर घोषणा केलेल्या आहेत, यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिक विमा व सर्वसाधारण महिलांसाठी 50 टक्के एसटी प्रवासामध्ये सवलत ह्या महत्त्वाच्या योजना चा समावेश आहे.

यासोबतच महाराष्ट्र शासनाने मुलींच्या संख्येमध्ये वाढ होण्यासाठी, मुलीची संख्या वाढविण्यासाठी, तिला सुदृढ बनवण्यासाठी मुलीच्या जन्मापासून शासन मुलीला तब्बल 98 हजार पर्यंत ची रक्कम देऊ करणार आहे अशी घोषणा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

कसे मिळणार पैसे (Lek Ladki Yojana Maharashtra)

पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना हा लाभ मिळणार आहे लेक लाडकी या योजनेच्या स्वरूपात हे पैसे मुलीला दिले जाणार आहेत.

मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, मुलगी पहिली मध्ये शाळेत गेल्यानंतर 4 हजार रुपये, सहावीमध्ये 6 हजार रुपये दिले जाणार आहेत आणि अकरावीत गेल्यानंतर 8 हजार रुपये मुलीचा अकाउंटला जमा होणार आहेत.

तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे असे मिळून एकूण रक्कम ही 98 हजार रुपये होणार आहे.

या योजनेचा लवकरच अर्ज आणि शासन निर्णय जारी केल्या जाणार आहे ज्यांना मुलगी असेल त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवेदन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

लेक लाडकी योजना पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात आणखी भरपूर योजना चा समावेश करण्यात आला यामध्ये सर्वसामान्य ना फायदेशीर असे योजना राबविण्यात आले आहेत.

लेक लाडकी योजनेमध्ये पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डधारक कुटुंबातीलच मुली अर्ज करू शकणार आहेत मुलीचे जन्मानंतर पालकांना ते अर्ज भरून द्यायचे आहेत यामध्ये मुलींना 98 हजार रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment