सरकारचा मोठा निर्णय !! या सर्व महिलांसाठी 4 नवीन योजनेला सुरुवात | Pradhan Mantri Mahila Loan Yojana

Pradhan Mantri Mahila Loan Yojana : महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२०२४ मधील ९ मार्च २०२३ रोजी केलेल्या आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात महिलांसाठी लाभदायक अशा अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.ह्या महत्वाच्या घोषणा कोणत्या आहेत हे आपण आज बघणार आहोत

तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आपल्या सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी लाभदायक कोणत्या योजनांची घोषणा केली हे देखील थोडक्यात जाणुन घेऊया.

लेक लाडकी योजना

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात असे घोषित केले आहे की लवकरच मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम अणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी लेक लाडकी ही योजना सुरू केली जात आहे.

ह्या योजनेअंतर्गत मुलींना एकुण ९८ हजार इतकी रक्कम आर्थिक मदत म्हणून महाराष्ट्र शासनाकडुन दिली जाणार आहे, फक्त ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या कुटुंबाचे केशरी तसेच पिवळे रेशनकार्ड असणे आवश्यक आहे.

महत्वाच्या योजनांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मानंतर तिच्या पालकांना ५ हजार रुपये दिले जाणार आहे.यानंतर जेव्हा ती मुलगी पहिल्या इयत्तेत जाईल तेव्हा तिला ४ हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे.

सहाव्या इयत्तेत गेल्यावर मुलीला ६ हजार रुपये देण्यात येणार आहे आणि जेव्हा ती मुलगी अकरावीत प्रवेश करेल तेव्हा तिला ८ हजार रुपये इतकी रक्कम ह्या योजनेअंतर्गत दिली जाते.

आणि जेव्हा मुलगी अठरा वर्षाची पुर्ण होईल तेव्हा तिला ७५ हजार रुपये इतकी रक्कम ह्या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे, म्हणजे ह्या योजनेअंतर्गत मुलींना एकुण ९८ हजार रुपये इतकी आर्थिक मदत शासनाकडून दिली जाईल.

महिला प्रवाशांना एसटी मध्ये मिळणार ५० टक्के सुट (PM Mahila Yojana)

२०२३-२०२४ मध्ये जाहीर केलेल्या आपल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे ज्यात असे सांगितले आहे की महिला प्रवाशांना शासनाच्या वतीने एसटी प्रवासामध्ये सरसकट ५० टक्के इतकी सुट दिली जाणार आहे.

म्हणजे आता महिलांना बस प्रवासासाठी फक्त अर्ध्या तिकिटाचे पैसे भरावे लागणार आहे.अर्ध्या तिकिटाचे पैसे त्यांना माफ केले जाणार आहे.

महत्वाच्या योजनांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आशा स्वयंसेविकांच्या वेतनामध्ये वाढ (Pradhan Mantri Mahila Loan Yojana)

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अशी देखील घोषणा केली आहे की आशा स्वयंसेविकांच्या वेतनामध्ये लवकरच वाढ केली जाणार आहे, त्यांचे वेतन ३५०० रूपये वरून ५ हजार इतके केले जाणार आहे.

अंगणवाडी सेविका यांच्या पगारात देखील वाढ

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात असे देखील सांगितले आहे की आता अंगणवाडी सेविका यांच्या पगारात देखील वाढ केली जाणार आहे, ज्यात अंगणवाडी सेविका यांचे मानधन ८३२५ वरून तब्बल १० हजार रुपये इतके केले जाणार आहे.

मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन सुदधा ५९७५ वरून ७२०० इतके केले जाणार आहे.गट प्रचारकाचे मानधन हे ४७०० वरून ६२०० इतके केले जाणार आहे.तर अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन ४४२५ वरून ५५०० रूपये इतके करण्यात येणार आहे.

अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका सहाय्यक इत्यादी पदाच्या २० हजार पदांकरीता लवकरच शासनाकडुन भरती केली जाणार आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment