RTE Admission 2023-24 : 1 ली ते 10 वी मोफत शिक्षणासाठी नवीन नोंदणी सुरू,असा भरा अर्ज

RTE Admission 2023-24 : 1 ली ते 10 वी मोफत शिक्षणासाठी नवीन नोंदणी सुरू,असा भरा अर्ज

दरवर्षीप्रमाणे 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी खाजगी शाळांमध्ये 25% राखीव जागावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे, RTE मार्फत तुमच्या मुलांना इंग्लिश मीडियम आणि मराठी मिडीयम मध्ये मोफत शिक्षणाची सुविधा दिली जाते.

या पंचवीस टक्के जागे मार्फत आर्थिक वंचित गटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा पुरवली जाते, यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो.

जुना लॉगिन आयडी आणि पासवर्ड असेल तर तुम्ही आता लॉगिन करून तुम्ही प्रोसेस करू शकता पण नवीन नोंदणी आणखी चालू झालेली नाही ती लवकरच सुरु होईल.

RTE Admission 2023-24ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

RTE अंतर्गत काही शाळेमध्ये इयत्ता 10 वी पर्यंत मोफत शिक्षण मिळते तर काही शाळांमध्ये इयत्ता पाचवीपर्यंत मोफत शिक्षणाची सोय आहे.

अर्ज कोण करू शकतो ?

वय वर्ष 4.5 पासून वय वर्ष 7.5 पर्यंत आर्थिक वंचित गटातील मुले-मुली येथे अर्ज करू शकतात हि सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून विद्यार्थ्यांची निवड सोडतीद्वारे केली जाते.

आवश्यक कागदपत्रांची यादी येथून डाउनलोड करा 

प्रवेशासाठी महत्त्वाची कागदपत्रे RTE Admission 2023-24

तुमच्या पाल्याला मोफत प्रवेश घ्याचा असेल तर हि कागद्पत्रे अत्यंत महत्वाची आहेत ते आतापासून बनवून तयार ठेवा.

  1. पत्त्याचा पुरावा – जसे की रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, गॅसचे बुक, भाडेपट्टी, कर पावती, विजेचे बिल, पाण्याचे बिल इत्यादी पैकी कोणतेही एक.
  2. आरक्षित संवर्गातून अर्ज करत असल्यास जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate) देणे आवश्यक आहे. (उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही)
  3. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पालकाचा उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) देणे आवश्यक. (पालकाचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे)
  4. विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला (Birth Certificate)
  5. विद्यार्थी अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला (Disability Certificate).
वयोमर्यादे साठी जीआर येथून डाउनलोड करा 

वयोमर्यादा – 31 डिसेंबर 2023 रोजी ( नवीन शासन निर्णया नुसार )

प्लेग्रुप आणि नर्सरी : 4 वर्षे 5 महिने 30 दिवस
ज्युनियर केजी : 5 वर्षे 5 महिने 30 दिवस
सिनिअर केजी : 6 वर्षे 5 महिने 30 दिवस
इयत्ता पहिली : 7 वर्षे 5 महिने 30 दिवस

महत्त्वाच्या सूचना (RTE Admission)

अधिकृत पोर्टलवरून आपल्या जवळच्या उपलब्ध शाळेची यादी डाउनलोड करून जवळच्या शाळेची माहिती घ्यावी त्यानंतरचा अर्ज करावा.
आरटीई पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंदणी दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ दुपारी ३ वाजेपासून सुरु होईल तरी इच्छुक पालकांनी आपले अर्ज २८ फेब्रुवारी पर्यंत भरायचे आहेत.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment