Zilla Parishad Yojana : जिल्हापरिषदेकडून ९०% ते १००% अनुदानावर मिळणार सायकल, शिलाई मशीन, तेलघाणा, पिठाची गिरणी,झेरॉक्स मशीन, मिरची कांडप

Zilla Parishad Yojana : जिल्हापरिषदेकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत.

अशाच काही योजना ची माहिती आपण खाली पाहणार आहोत, या योजना वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये राबवल्या जात आहेत.

काही जिल्हा परिषदेमध्ये ऑनलाईन तर काही जिल्हा परिषदेमध्ये ऑफलाइन अर्ज करायचे आहेत.अर्ज कुठे करायचा कसा करायचा याची सविस्तर माहिती खालील लिंक वर दिलेली आहे.

अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या  आहेत योजना (Zilla Parishad Yojana)

जिल्हा परिषद बुलढाणा (१००% अनुदान)

  • a) मागासवर्गीय महिलांसाठी शिलाई मशीन
  • b) मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी ५ एच पी विद्युत मोटर पंप

जिल्हा परिषद जालना (ऑनलाईन अर्ज) १००% अनुदान

  • c) मागासवर्गीयांना मोफत मिरची कांडप यंत्र
  • d) मागासवर्गीयांना तुषार संच पुरविणे
  • e) मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन वाटप
  • f) मागासवर्गीयांना मिनी पिठाची गिरणी वाटप
  • g) दिव्यांगांना झेरॉक्स मशीन वाटप
  • h) दिव्यांगांना स्वयंचलित सायकल वाटप
  • i) दिव्यांगांना मिनी पिठाची गिरणी वाटप

जिल्हा परिषद पुणे (ऑफलाईन अर्ज) ९०% अनुदान

  • पीठ गिरणी योजना
  • शिलाई मशीन योजना
  • तेलंगणा योजना
  • सोलर वॉटर हिटर योजना

सदर साहित्याच्या अर्ज मध्ये नमूद अटी व शर्तीनुसार तपासणी करून खात्री झाल्याशिवाय संबंधित लाभार्थ्याच्या अर्ज तपासणी करून परिपूर्ण कागदपत्रासह भरले जाणार आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

प्राप्त झालेल्या अर्जांमधून प्राप्ता अर्ज पात्रा अर्ज कार्यालयास दिनांक 05.12.2022 पर्यंत सादर करावे त्यानंतर आलेल्या अर्ज चा विचार केला जाणार नाही.

व त्यामुळे लाभार्थी लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी वरील अधिकाऱ्यांची राहील.

अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे

  • वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक 08 जून 2022 नुसार लाभार्थी यांच्या आधार कार्ड बँक अकाउंट सोबत संलग्न असतील तर त्यांच्या अर्ज समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद येथे सादर करण्यात यावा.
  • लाभार्थी मागासवर्गीय असल्याबाबतचा तहसीलदार उपविभाग अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र
  • वार्षिक उत्पन्न 50000 च्या आत असल्याबाबत तहसीलदाराचा दाखला
  • पाच एचपी विद्युत मोटर पंप करिता जलसिंचनाची सुविधा असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • सातबारा गाव नमुना आठ
  • बँक पासबुकची झेरॉक्स
  • रहिवासी दाखला
  • आधार कार्ड छायांकित प्रत

Jilha Parishad Yojana

अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

नियम व अटी (Jilha Parishad Yojana)

  • लाभार्थीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे किंवा साठ वर्षापेक्षा कमी असावे याबाबतचे सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला घेणे आवश्यक.
  • जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत मागील तीन वर्षात लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा याची खात्री मास्टर नोंदवही वरून करून अर्ज पंचायत समिती कडे सादर करण्यात यावे.
  • वरील सर्व अटीचे पूर्तता करूनच पात्र अर्ज सादर करावे अपात्र अर्ज सादर करण्यात येऊ नये.
  • सदर योजनेमधील लाभार्थी निवडी बाबतचा अधिकार समाज कल्याण विषय समितीला राहील.

Jilha Parishad Yojana

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment