Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार, 1 रुपयांत पीकविमा आणि महिलांना प्रवासात ५०% सूट

Maharashtra Budget 2023 : आज महाराष्ट्राच्या नवीन सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या लाभासाठी भरपूर घोषणा केलेल्या आहेत.

त्यामध्ये शेतकऱ्यांना 12 हजार रुपये दरवर्षी देण्याचा निर्णय तसेच पिक विमा एक रुपयांमध्ये देण्याची घोषणा सुद्धा शिंदे सरकारच्या या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

यासाठी 6900 कोटी रुपयांचा भार राज्य शासनावर पडणार असून हा सर्व भार राज्य शासन उचलणार असल्याचे जाहीर केले आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रति शेतकरी प्रति वर्ष 06 हजार रुपये राज्य सरकार देणार आहे तसेच केंद्र सरकारचे 6000 असे मिळून दरवर्षी प्रति शेतकऱ्याला 12000 रुपये एवढा लाभ मिळणार आहे.

12000 रुपयांचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

याचा लाभ 1.15 कोटी शेतकरी कुटुंबाला मिळणारा असून प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारने सहा हजाराची ही भर आजच्या अर्थसंकल्पात टाकली आहे.

१ रुपयात पीकविमा (Maharashtra Budget 2023)

यासोबतच शेतकऱ्यांना भरावा लागणारा पिक विमा व त्याची 2 टक्के रक्कम हे सुद्धा सरकार भरणार असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया मध्ये आपल्या पिकाचा विमा काढता येणार आहे.

त्यासाठी वेगळी कोणतीही रक्कम भरायची गरज नसून फक्त एक रुपयात तुमच्या पिकाचा विमा काढला जाईल आणि त्याचे नुकसान भरपाई सुद्धा तुम्हाला मिळेल.

1 रुपयात पिक विमा कसा मिळेल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महिलांना प्रवासात ५०% सूट (#MahaBudget 2023)

तिसरी महत्त्वाची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली यामध्ये सर्व महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सूट देण्यात येत असून आता महिला फक्त 50 टक्के रक्कम भरून महाराष्ट्रात कोठेही एसटीने प्रवास करू शकणार आहेत.

महिलांसाठी हा अत्यंत लाभदायी निर्णय शिंदे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात घेण्यात आला याची जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पात केलेली आहे.

  व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment