Vihir Anudan Yojana 2023 : उन्हाळ्याच्या तडाख्यात शेतकऱ्यांना दिलासा, विहीरीसाठी मिळणार सरकारकडून 4 लाखांचे अनुदान

Vihir Anudan Yojana 2023 : सध्या उन्हाळ्याची काहिली जाणवायला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्याचा तडाखा जाणवत असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणिपुरवठा करण्यासाठी मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पाणीपुरवठा कमी असल्यामुळे शेताला सिंचन करणे सध्या कठीण झाले आहे. कारण सध्या अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई आहे. ज्यांच्या शेतामध्ये मोटार आहे त्यांच्या शेतात पाणी घालण्यासाठी विहिरी आहेत.

मात्र सर्व शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सारखी नसल्याने शेतीसाठी लागणारा पाण्याचा प्रश्न सर्वांनाच सोडवणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांची ही अडचण सरकारने लक्षात घेऊन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

हे अनुदान कसे भेटेल, अर्ज कसा भरावा आणि त्याची योग्यपद्धत काय, याची माहिती पुढीलप्रमाणे आहे Vihir Anudan Maharashtra

या योजनेसाठी पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • सात बारा
  • 8 अ उतारा
  • ग्रामपंचायत निवासी स्वघोषणा पत्र
  • जॉब कार्ड
अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन विहीर अनुदान योजना Vihir Anudan Yojana 2023

ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्या मदतीने पंचायत समितीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कक्षाकडे सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील. यानंतर तुम्ही सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.

संपूर्ण पडताळणी झाल्यावरच तुमचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून विहिरी खोदण्यास सांगितले जाते. त्यानंतर मशीन किंवा मजुराच्या साहाय्याने विहीर खोदण्यात येते.

Vihir Anudan Yojana 2023आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment