Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! आता गहू, तांदुळाऐवजी मिळणार पैसे,नवीन शासन निर्णय आला

Ration Card News : सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे, 28 फेब्रुवारी 2023 ला शासन निर्णय पारित करण्यात आला या शासन निर्णयामध्ये सर्वसामान्यांना मिळणाऱ्या धान्य ऐवजी आता त्यासाठी पैसे दिले जाणार आहेत आणि ती रक्कम थेट बँकेमध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे.

जर तुम्ही रेशन कार्ड धारका असेल तरीही रक्कम तुम्हाला सुद्धा मिळणार आहे कोणाला किती रक्कम कशासाठी मिळेल याची सगळी माहिती तुम्हाला पोस्टमध्ये खाली दिली आहे ते सविस्तर माहिती वाचा आणि तो शासन निर्णय खालील लिंक वरून तुम्ही डाऊनलोड करून तो सुद्धा व्यवस्थित वाचू शकता.

शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

येथील रेशन कार्ड धारकांना मिळणार पैसे (Ration Card News)

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग विभागाच्या 24 जुलै 2015 च्या शासन निर्णयानुसार राज्यातल्या औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा 14 जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी  (APL) एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी पहिले पाच किलो अन्नधान्य मिळायचे त्यामध्ये गहू असायचे आणि तांदूळ दिले जायचे.

पण या योजनेअंतर्गत येथून पुढे राशन देणार नसून थेट पैसे यासाठी तुम्हाला मिळणार आहेत त्याचा शासन निर्णय 28 फेब्रुवारीला जारी करण्यात आला 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 22 रुपये प्रति किलो गव्हासाठी आणि 23 रुपये प्रति किलो तांदूळ यासाठी याप्रमाणे रक्कम दिले जाणार आहे.

या योजनेत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी दर महिन्यात 150 रुपये लाभार्थ्याला थेट अकाउंट मध्ये पाठवले जाणार आहेत त्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्टॅंडर्ड प्रोसिजर (SOP) बनवलेली आहे, ती प्रक्रिया शासन निर्णयामध्ये सविस्तर सांगितलेली आहे.

खालील लिंक वरून शासन निर्णय डाऊनलोड करू शकतात आणि या रकमेचा लाभ मिळवायचा असेल तर यासाठी अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे, तो अर्ज चा नमुना, त्याच्यासोबत शिधापत्रिकाच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची झेरॉक्स आणि बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला भरून संबंधित कार्यालयात सादर करायची आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment